कारल्याच्या रसात केशर वाटून घेतल्यास यकृताचे अनेक विकार बरे होतात



थंडीपासून बचाव होण्यासाठी केशर मधात मिसळून खावं.



चंदन आणि केशर कडुनिंबाच्या रसात किंवा मधात उगाळून घेतल्यास मूत्राशयाचे विकार बरे होतात.



शरीरातील रक्तशुद्धीसाठी चंदन आणि केशर कडुनिंबाच्या रसात किंवा मधात उगाळून घ्यावे



दूध किंवा मधासोबत केशर घेतल्यास त्वचेचा पोत सुधारतो.



केशरची पेस्ट काळे डाग आणि मुरुमांवर उपयुक्त ठरते.



वयोमानानुसार येणारा विसराळूपणा कमी करण्यासाठी केशरची मदत होते.



ग्लासभर दुधात चिमुटभर केशर आणि मध घालून प्यायल्याने सर्दीपासून आराम मिळतो.



केशरमध्ये चंदन आणि मध मिसळून तयार केलेला फेसपॅक २० मिनिटं चेहऱ्याला लावल्याने फायदा होतो.



रोज केशरचं दूध प्यासल्याने नैराश्य ची समस्या दूर होते.