कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. अनेक जणांना लिंबू सलाडमध्ये, जेवणात, लिंबूपाणी आणि चाट पकोड्यांमध्ये घालून खायला आवडते. लिंबू योग्य प्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु लिंबाच्या जास्त वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. लिंबाच्या अतिसेवनामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात तसेच त्याचा तुमच्या पचनावरही वाईट परिणाम होतो. जर तुम्ही आहारात लिंबाचा जास्त वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. लिंबू आम्लयुक्त असल्यामुळे दातांच्या समस्या होऊ शकतात. तुम्हाला दातासंबंधित समस्या असल्यास लिंबू खाणे बंद करा. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.