देशात कोरोनाच्या संसर्गात सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये वाढ पाहायला मिळाली आहे देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 940 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे नवीन कोरोनाबाधितांच्या आकडा जरी किंचित घटला असला तरीही देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे सध्या देशामध्ये कोरोनाचे 91 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत शुक्रवारी झालेल्या नवीन 20 मृत्यूंमुळे देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 24 हजार 974 वर पोहोचला आहे गेल्या 24 तासांत 12 हजार 425 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे राज्य सरकारचा मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीबाबत विविध मुदद्द्यावर चर्चा झाली कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतं आहे