कमी वेळेत तयार होत असल्याने अनेक जण ब्रेकफास्टमध्ये अंड्याला प्राधान्य देतात. अंडी खाल्ल्याने शरीराला फायदे होतात. मात्र, काही लोकांसाठी हानीकारक ठरू शकतात. पचनबाबत समस्या असणाऱ्यांना अंडी खाणे टाळावे. अंडी पचन करण्यास वेळ घेत असल्याने पचनासंबंधीच्या समस्या वाढीस लागू शकतात. कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास अंडी खाणे टाळावे. अंड्यातील पिवळा भाग कोलेस्ट्रॉलच्या आजाराला निमंत्रित करू शकतात. हृदयविकाराचा आजार असलेल्यांनी अंडी खाणे टाळावे. अंडी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होऊ शकतात. अंडी हे उष्ण असतात. जर तुम्हाला अतिसाराची समस्या असेल तर अंडी खाणे टाळावे.