लठ्ठपणा, धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव, फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन आणि चुकीचा चरबीयुक्त आहार यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. धूम्रपान केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी एलडीएल वाढू शकते हे देखील एक ज्ञात सत्य आहे. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे कोलेस्टेरॉलची पातळी असामान्य होऊ शकते. जंक फूड, मसालेदार, तेलकट, कॅन केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा. ओमेगा-3 रक्तप्रवाहात ट्रायग्लिसराइड्स कमी करतात आणि हृदयाची असामान्य लय सुरु होण्यापासून रोखण्यासाठी मदत करुन हृदयाचे रक्षण करतात. कार्बोनेट्ड पेय, बेकरी पदार्थ, मिष्टान्न, मिठाई आणि नमकीन यांचे सेवन टाळा. तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करा. मद्यपानामुळे उच्च रक्तदाब, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दररोज व्यायाम केल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तुम्हाला तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवावी लागेल तसेच वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.