योग हा मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. तणाव, वाढत्या वजनाची समस्या अशा अनेक समस्यांपासून तुम्ही योग करुन सुटका मिळवू शकता.



इतकंच नाही तर अनेक जण त्यांच्या उंचीबाबत समाधानी नसतात. तुम्ही योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करुन उंची वाढवू शकता.



नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. नियमित योग केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.



मानवी शरीराची वाढ त्यातील गुणसूत्र आणि जनुकांच्या आधारे होते. यामुळे अनेकांच्या शरीराची वाढ वेगवेगळ्या प्रकारे होते. काहींची उंची जास्त तर काहींची कमी असते.



काही जण उंची वाढण्यासाठी औषधांचीही मदत घेतात, पण याचा काही फायदा झालेला दिसत नाही. पण तुम्ही योगासनांच्या मदतीने नैसर्गिक प्रकारे उंची वाढवू शकता.



सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवा. दोन्ही हात जोडा आणि आपल्या छातीजवळ आणा. आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेऊन जा.



हात सरळ ठेवा आणि ताणून घ्या. तुमच्या दोन्ही पायांची टाच उचला आणि पायाच्या बोटांवर उभे रहा. 10 सेकंद या स्थितीमध्ये रहा.



जमिनीवर सरळ उभे राहा आणि हात शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा. उजवा गुडघा वाकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवा. तुमच्या पायाचा तळवा मांडीला स्पर्श करेल अशा स्थितीत ठेवा.



आता तुमचे हात जोडून ते डोक्याच्या बाजूला सरळ वर न्या. तुमचे संपूर्ण शरीर ताणलेले असावे आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. या आसनात 30 सेकंद राहा.



दोन्ही पाय मागच्या बाजूला दुमडून जमिनीवर बसा. तुमचे दोन्ही हात समोर ठेवून बोट एकमेकांमध्ये अडकून जमिनीवर ठेवा. बोटांमध्ये असलेल्या जागेमध्ये डोकं ठेवा.



आता पाय उचलण्याचा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला पाय वर करता येणार नाही. हे आसन करताना तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता.