स्टायलिश दिसण्यासाठी अनेक जण नखांना नेलपेंट लावतात. सध्या वेगवेगळ्या नेलआर्टचाही ट्रेंड आहे.



तरुणी पैसे खर्च करुन पार्लरमध्ये आवडीचं नेलआर्ट करतात. एवढंच नाही तर आजकाल तरुणांमध्येही नेलपॉलिश लावण्याचा ट्रेंड आहे.



विशेषत: तरुणी आपल्या हातापायांची निगा राखायला आवडतं. हातापायांनी छान नेलपॉलिश लावणं अनेक तरुणींना आवडतं.



तुम्हीही जर नेलपेंटचे शौकीन असाल आणि तुम्हालाही नखांना नेलपॉलिश लावायला आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.



काही संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, नेलपॉलिश तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.



एका संशोधनानुसार, नेलपॉलिशचा सर्वात वाईट परिणाम मनावर परिणाम होतो. यामुळे सर्वात मोठा धोका उद्भवतो.



नेलपॉलिशमध्ये असलेलं रसायन शरीरात जातं आणि या केमिकल्समुळे तुमच्या शरीरात वेगवेगळे बदल घडून येतात.



याशिवाय नेल पेंटचा तुमच्या मनावर आणि मानसिक आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो.



नेलपॉलिशमध्ये आढळणारे फॉर्मल्डिहाइड रेझिन, डिब्युटाइल फॅथलेट आणि टोल्युइनमुळे या केमिकल्समुळे ऍलर्जी किंवा त्वचारोग होण्याचाही धोका असतो.



याशिवाय नेलपेंटमध्ये फ्थालेट्स या रसायनामुळे मधुमेह आणि थायरॉईड सारखे आजार होण्याचीही शक्यता आहे.



याशिवाय नेलपॉलिशमध्येही स्पिरिटचा वापर केला जातो. या स्पिरिटचा तुमच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो.