संत्र्याप्रमाणेच सालही आरोग्यासाठी उपयुक्त; फेकण्याआधी हे वाचा
संत्री हे फळ अनेकांना आवडते.
संत्र्यांचा ज्युस पिऊन अनेक लोक दिवसाची सुरुवात करतात.
संत्री हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अनेक लोक संत्री खाल्यानंतर त्याचे साल फेकून देतात.
पण संत्रीचे साल न फेकता तुम्ही त्याचा वापर करु शकता
फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते
संत्र्याची साल हे ब्लॅक हेड्स, डाग, पिंपल्स, डेड स्किन सेल्स इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दूर करते
तुम्ही संत्रीचे साल कच्च चावून खाऊ शकता किंवा त्याची पावडर तयार करुन त्या पावडरमध्ये मध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या जाणवत असतील तर संत्रीचे साल खा
संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर राहतात