आईस्क्रीम खाणं लहानथोर सगळ्यांनाच आवडतं, पण हिवाळा आला की आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, थंडीतही आईस्क्रीम खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.

तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल की, हिवाळ्यात गरम अन्नपदार्थांचं सेवन केले पाहिजे, यामुळे शरीर उबदार राहण्यास आणि उर्जा मिळण्यात मदत होते. उन्हाळ्यात आइस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडते, पण हिवाळ्यात आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो.

अनेक वेळा आपल्या घरातील मोठी माणसंही सांगतात की, हिवाळ्यामध्ये म्हणजेच थंडीमध्ये आईस्क्रीम खाणं टाळावं. ताप-खोकला-सर्दी होण्याचा धोका असल्याने बहुकेत जण थंडीमध्ये आईस्क्रीम खाणं टाळतात.

हिवाळ्याच आइस्क्रीम खाल्ल्यामुळे तुमचं नुकसान होत नाही, तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. हे फायदे कोणते ते जाणून घ्या.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आइस्क्रीम खाण्यास थंड असलं तरी त्याचा प्रभाव गरम असतो. आइस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील उष्णता वाढवण्याचं काम करते.

घसादुखीपासून मिळेल आराम : घसा खवखवत असल्यास तुम्ही खाल्ल्यास तुम्हाला घसादुखीपासून आराम मिळेल.

तणाव कमी होतो : एका सर्वेक्षणात असे आढळून आलं आहे की, आईस्क्रीम खाल्ल्याने तणाव कमी होतो. जर तुम्ही दिवसभराच्या कामाने मानसिकदृष्ट्या थकले असाल तर तुम्ही आइस्क्रीम घाल्यावर तुमचा ताणतवाण नाहीसा होतो.

प्रथिने : आईस्क्रीम दुधापासून बनते आणि दुधात प्रथिने आढळतात. प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू, त्वचा, हाडांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे हिवाळ्यातही आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळून फायदा होतो.

जीवनसत्त्वे : आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन ए, बी2 आणि बी12 भरपूर प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ए आपले डोळे, त्वचा, हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राखते. आईस्क्रिममध्ये ही सर्व जीवनसत्त्वे म्हणजे व्हिटॅमिन्स असतात.

ओमेगा 3 : आइस्क्रीममध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 ही भरपूर प्रमाणात असतात. ओमेगा 3 मेंदू, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे तर व्हिटॅमिन डी शरीराच्या हाडांसाठी महत्त्वपूर्ण आहे.