संत्र्याप्रमाणेच त्याच्या साली आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते.
संत्र्याची साल हे ब्लॅक हेड्स, डाग, पिंपल्स, डेड स्किन सेल्स इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दूर करते.
संत्रीच्या सालांपासून पावडर बनवून त्यात खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्यानं कोंडा होत नाही.
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या जाणवत असतील तर संत्रीचे साल खा.
संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर राहतात.
संत्रीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.
संत्र्याच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.
संत्रीच्या सालाची पावडर तयार करुन ती गरम पाण्यामध्ये मिक्स करुन ते पाणी प्या.
तुम्ही संत्रीचे साल चावून खाऊ शकता. जर हे साल चावून खात असताना, या सालीची चव तुम्हाला कडू लागत असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा संत्रीच्या सालाची पावडर आणि मध मिक्स करुन पिऊ शकता.