वायू प्रदूषण ह्रदय आणि फुफ्फुसांसाठी नुकसानदायक आहे, हे सर्वांना माहित आहे. आता एका नव्या संशोधनानुसार वायू प्रदूषणाचा शरीराच्या इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो, हे समोर आलं आहे.



जगात असंख्य असे देश आहेत जिथे प्रदूषण आहे. असा क्वचितच एखादा देश असेल, जिथे प्रदूषणाची समस्या नाही. वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे.



वायू प्रदूषणामुळे ह्रदय आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो, हे आपल्याला माहित असेल. पण वायू प्रदूषणाचा तुमच्या शरीरातील इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो, असं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे.



या संशोधनामध्ये वायू प्रदूषणाचा संपूर्ण शरीरावर काय परिणाम होतो, याबाबत अभ्यास करण्यात आलं.



मीडिया रिपोर्टनुसार, जनरल फ्रंटियर्स एंड पब्लिक हेल्थमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी या संशोधनात वायू प्रदूषणाचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केल्याचं सांगितलं आहे.



शास्त्रज्ञांच्या मते, हे संशोधन जगातील सर्वात मोठं संशोधन असल्याचा दावा केला आहे. शास्त्रज्ञांनी या संशोधनात इंग्लंडमधील 3 लाख 64 हजार लोकांचा समावेश केला होता.



अधिक काळ वायू प्रदूषणासोबत संपर्क आल्यास त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचं या संशोधनात निरीक्षण करण्यात आलं.



वायू प्रदूषणामुळे हवेतील सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डायऑक्साईडमुळे (NO2 - Nitrogen Dioxide) शरीरात जाऊन अनेक समस्या निर्माण होतात, असं या अभ्यासातून समोर आलं आहे.



वायू प्रदूषणामुळे मज्जासंस्थेचे विकार, श्वसनसंस्था, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूचे आजार दिसून आलं. यामध्ये नैराश्य, चिंता या समस्यांचा समावेश होता.



या संशोधनात असं आढळून आलं आहे की, जे लोक जास्त रहदारी असलेल्या भागात राहत होते. तेथे वायू प्रदूषणाची प्रमाण वाढतं.



अधिक वायू प्रदूषणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.