भारतात चहा प्रेमींची संख्या कमी नाही.



अनेकजण दिवसांत अनेकदा चहा घेतात.



एकप्रकारे चहाचे त्यांना व्यसन लागलेले असते.



मात्र, चहाचे व्यसन तुमच्या आरोग्यावर परिणाम करणारे ठरू शकतात.



दिवसात किती वेळा चहा पिणे योग्य राहिल, असाही प्रश्न आहे.



तुम्ही दिवसभरातून दोन कप चहा घेत असाल तर योग्य प्रमाण आहे.



त्यापेक्षा अधिक चहा घेणे धोकादायक ठरू शकते.



झोप न येण्याची समस्या जाणवू शकते.



छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, अपपचन आदी त्रास होऊ शकतो.



अधिक प्रमाणात चहा घेतल्याने तुमच्या आतड्यांवर परिणाम होऊ शकतो.