ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात.



ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येतो.



मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अटॅक येणं किंवा स्ट्रोक सारखे त्रास होऊ शकतात.



ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.



जास्त आवाजामुळे हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोनच्या पातळीत बदल होतो.



ज्या कुटुंबात ह्रदयरोगाचा इतिहास असेल अशा घरातील तरुणांनाही मोठ्या आवाजानं अचानक हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.



ज्या लोकांना आधीपासून हृदयविकाराचा धोका आहे, त्यांच्या ध्वनिप्रदुषणामुळे हृदयाच्या नसा आकुंचित होऊ शकतात.



त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची आणि मेंदूचा पक्षाघात होण्याची शक्यता असते.



मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते.



त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.