महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेचं मुख्य आकर्षण हे सिध्दरामेश्वरांचा विवाह सोहळा आहे. सिध्दरामेश्वर यांचा अक्षता सोहळा यावर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, पोलीस आयुक्त हरीश बैजल आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावली होती. आगळ्या वेगळ्या या विवाह सोहळ्यात सिध्दरामेश्वरांचे भक्त पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करतात. बारा बंद असल्यानं या पोषाखाला बारा बंदी म्हणतात. बाराबंदीचा मानही आठरा पगड जातीला मिळतोय. समजातल्या सर्व जाती धर्मांना या यात्रेत सामवून घेतल जात. कुठलाही भेदभाव, कुठल्याही निमंत्रणाशिवाय लोक या यात्रेला हजेरी लावतात. यात राजकीये नेतेदेखील मागे नसतात. सोहळ्यासाठी शहरातल्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत सिध्देश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक केला जातो. (छाया सौजन्य : चेतन लिगाडे)