रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ ISROचे नवे प्रमुख!

एस सोमनाथ यांनी GSLV Mk-III लॉन्चर च्या विकासात महत्वाची भूमिका निभावली आहे.

आता एस सोमनाथ ISRO मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख असेलेल्या सिवन यांची जागा घेतील.

ISRO चे नवनियुक्त अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटलं की, भारतीय अंतराळ कार्यक्रम ISRO पर्यंतच मर्यादित आहे.

मात्र आता सरकारची इच्छा आहे की, या क्षेत्रात नवीन लोकं यावीत.

सोमनाथ यांनी अंतराळ बजेट वाढवण्याची गरज देखील बोलून दाखवली.

के सिवन यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे.

सध्याचं अंतराळ बजेट 15,000-16,000 कोटी आहे. जे वाढवून 20,000-50,000 कोटींहून अधिक करण्याची गरज आहे.

इसरोचं खाजगीकरण मात्र होणार नाही, असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.