आपल्याकडे केळी पिकवणारा शेतकरी हा बागायतदार शेतकरी समजला जातो. आता मात्र शेतकऱ्यांवर परवडत नाही म्हणून केळीचे झाड शेतीच्या बाहेर टाकण्याची वेळ आलीय. झाडाला लगडणारी केळी काढायला सुद्धा परवडत नाही म्हणून आता अशीच पिकून खराब होऊ लागलीय. गेवराईच्या श्रीपत अंतर्वाला गावच्या वैजनाथ वाकळे यांची एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी बाग वाढवली. केळीला दीडशे ते दोनशे रुपये क्विंटल एवढा भाव मिळतोय यावर्षी मात्र केळीचा बाजार उठल्याने शेतात असा केळीचा सडा पडलाय. केळीला आता कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळं केळी जनावरांसमोर टाकावी लागत आहे सध्या केळीला केवळ दीडशे ते दोनशे रुपये क्विंटलला भाव आहे.