होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया ने आपली 2022 होंडा सीबी 300 आर मोटरसायकल लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत 2.77 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नवी Honda CB300R दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे. बाईकची बुकिंग सुरु करण्यात आली आहे. PGM-FI तंत्रज्ञानासोबत 286cc DOHC चार-वॉल्व लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 9000rpm वर 31 bhp पावर आणि 6500 rpm वर 27.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करु शकतो. बाईकच्या सर्क्युलर हेडलँपमध्ये LED युनिट्स आणि इंटिग्रेटेड LED डे-टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहेत. तसेच याचे साईड्स स्लीक एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्ससह देण्यात आले आहेत.