प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हीचं ग्लॅमर एखाद्या नवोदित अभिनेत्रीलाही लाजवेल असं आहे. श्वेता तिवारी वयाच्या चाळीशीत आहे, पण अंदाज तिच्याकडे पाहिल्यावर याचा अंदाज येत नाही. अभिनेत्री श्वेता तिवारीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या चाळीशीतही श्वेता तिवारीचं सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारं असं आहे. आता श्वेताचा सिझलिंग लूक पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. या लूकमध्ये श्वेता खूप सुंदर आणि हॉट दिसतेय. श्वेता नेहमी तिच्या स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे सतत चर्चेत असते. श्वेताचा असा स्टायलिश आणि बोल्ड लूक पाहून वाटत नाही की ती 41 वर्षांची असून दोन मुलांची आई आहे. श्वेता फिटनेसची खूप काळजी घेते. श्वेता तिच्या पर्सनल लाईफमुळेही बऱ्याच वेळा चर्चेत असते. श्वेता तिवारीला 'कसोटी जिंदगी की' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. श्वेता तिवारी सोशल मीडियावर चाहत्यांसोबच तिच्याबाबतच्या अपडेट्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.