अभिनेत्री अनुष्का शर्मा अॅमेझॉन प्राइमसाठी कॉप-ड्रामा तयार करणार आहे. अनुष्का कॉप ड्रामा कयार करणार असली तरी या मालिकेत ती अभिनय करताना दिसणार नाही. या मालिकेचे दिग्दर्शन सुदीप शर्मा करणार आहेत. सुदीप शर्मा यांनी यापूर्वी NH 10 आणि उडता पंजाब सारख्या चित्रपटांसाठी कथा लिहिल्या होत्या. या मालिकेचे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेतील कलाकारांची निवड अद्याप झालेली नाही. ही मालिका प्रेक्षकांसाठी आशादायक ठरेल अशी आशा आहे. अनुष्कांच्या या कॉप ड्रामाची चाहत्यांना उत्सुकता लाहून राहिली आहे. अनुष्काचा कॉप ड्रामा कसा असणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अनुष्काचा कॉप ड्रामा कधी प्रेषकांच्या भेटीला येणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.