आपल्याला दुर्मिळ असा मायोसिटिस आजार झाल्याची माहिती अभिनेत्री समंथाने (Samantha) इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. समंथाच्या (Samantha Ruth Prabhu) चाहत्यांसाठी काळजी वाढवणारी एक बातमी आहे. समंथाने इन्स्टाग्रामवर (Instagram) हा फोटो शेअर करताना सांगितलं की ती मायोसिटिस नावाच्या एका दुर्मिळ आजाराशी लढत आहे. यातून बरं होण्यासाठी आपल्याला थोडा अधिक वेळ लागतोय. मायोसिटिस हा ऑटोइम्यून कंडिशन (Autoimmune Condition Myositis) असलेला आजार आहे. आपल्या शरीरातील मांस पेशींना आलेल्या सूजेमुळे मायोसिटिस हा आजार जडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. आपल्या शरीरातील मांस पेशींना आलेल्या सूजेमुळे मायोसिटिस हा आजार जडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. मायोसिटिस ही एक अशी ऑटोइम्युन कंडिशन असते ज्याचा परिणाम शरीरातील मांस पेशींवर होतो. आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मायोसिटिस या आजारावर अद्याप तरी कोणताही ठोस उपाय नाही. पण नियमित तपासणी, व्यायाम, योगा आणि इम्युनोसप्रेसेन्ट औषधं याच्या वापराने हा आजार बरा होऊ शकतो.