छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत. छोट्या पडद्यावरील सम्राज्ञी अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. श्वेताने नुकतेच एथनिक वेअरमधील फोटोशूट शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये श्वेताने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोशूटमधील तिचे हास्य चाहत्यांना घायाळ करणारे आहे. ओपन हेअर आणि लाइट मेकअप करत श्वेताने लूक पूर्ण केला आहे. श्वेता तिवारीच्या या सुंदर स्मित हास्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. श्वेता तिवारी छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली. वयाच्या 42 व्या वर्षातही तिचे सौंदर्य तरुणींना लाजवेल असेच आहे. श्वेता तिवारीने 16 व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती.