बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नानाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आज अथिया तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. अथियाने आठ वर्षांपूर्वी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं असून गेल्या आठ वर्षांत तिने फक्त पाच सिनेमांत काम केलं आहे. तिने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'हीरो' या सिनेमाच्या माध्यमातून केली. अथियाचे सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. एकही सिनेमा यशस्वी झालेला नसला तरी अथिया खासगी आयुष्यामुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे. अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षी अथियाला खास पोस्ट शेअर करत केएल राहुलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अथिया आणि के. एल. राहुल हे 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत.