टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.



भारताचा स्टार सलामीवीर संघात लवकर पुनरागमन करण्याची शक्यता आहे.



डेंग्यूची लागण झाल्याने शुभमन गिल विश्वचषकातील सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकला आहे.



शुभमन गिलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.



शुभमन गिल आज अहमदाबादसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.



भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये रंगणार आहे.



अहमदाबादसाठी रवाना झाल्यास शुभमन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



दरम्यान, अद्याप बीसीसीआयकडून शुभमन गिलच्या खेळण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



शुभमन गिलला सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.



गिलला डेंग्यूची लागण झाली होती. प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.



मात्र, आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो सध्या वैद्यकिय पथकाच्या निगरानीमध्ये आहे.



टीम इंडिया आणि चाहत्यांना शुभमन गिल मैदानावर कधी परतणार याची प्रतिक्षा आहे.



याबाबत पुढच्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल.