विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.



भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.



शुभमन गिलला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.



शुभमनचे प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.



बीसीसीआयने गिलबाबत हेल्थ अपडेट जारी करताना ही माहिती दिली आहे.



शुभमन गिलला काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती, त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.



दरम्यान, सोमवारी रात्री प्लेटलेट्स कमी झाल्याने शुभमनला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे.



शुभमन गिल अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार हे आधीच समोर आलं आहे.



आता शुभमन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरण्यावरही प्रश्न उपस्थित होत आहे.



टीम इंडिया आणि चाहते शुभमन लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत.



टीम इंडियाला धडाकेबाज सलामवीर शुभमनची अनुपस्थिती संघासाठी अडचण निर्माण करणारी आहे.