भारतीय संघ गेल्या 12 वर्षापासून विश्वचषक ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत आहे.

यंदाचा वर्ल्ड कप भारतात होत असल्याने भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

.मात्र विश्वचषकातील पहिल्या सामन्याअगोदर भारतीय संघाला धक्का बसला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झालीय.

त्यामुळे आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे

शुभमनच्या अनुपस्थितीत सलामीला कोणाला उतरवाचे असा प्रश्न सध्या टीम इंडियाला भेडसावत आहे.

इशान किशन किंवा केएल राहुल ची नावे सध्या चर्चेत आहे.

विश्वचषकात पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

त्यामुळे डावाच्या सुरुवातीला शुभमनच्या जागी इशान किशन किंवा केएल राहुल हे दोन पर्याय कर्णधार रोहित शर्मासमोर उपलब्ध आहेत.