'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील माधवी भिडे ही भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशी या साकारतात. गेली 13 वर्ष त्या सोनालिका या मालिकेत काम करत आहेत. सोनालिका या डिझायनिंग बिझनेस सांभाळतात. सोनालिका यांचा मुंबईमध्ये 3 BHK फ्लॅट आहे. सोनालिका या बोरीवली येथे 1 BHK फ्लॅटमध्ये राहात होत्या. सोनालिका यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. जवळपास 18 लाख किंमत असणारी MG Hector ही गाडी देखील सोनालिका यांच्याकडे आहे. Swanky Maruti आणि टोयोटा इटियॉस ही गाडी देखील त्यांच्याकडे आहे. सोनालिका यांनी 5 एप्रिल 2004 रोजी समीर जोशी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.