सुवर्णवीर... नीरज चोप्राचा वाढदिवस; 'या' गोष्टी जाणून घ्या

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणारा नीरज चोप्रा.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.



देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो दुसरा खेळाडू आणि पहिला अॅथलीट बनला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतरासह पहिले स्थान मिळवले.



सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रासोबत एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली होती. यावेळी हे गोल्ड मेडल दिवंगत मिल्खासिंग यांना समर्पित करत असल्याचं नीरजनं सांगितलं होतं. मिल्खासिंग यांचं स्वप्न पूर्ण झालं, पण आज ते नाहीत, असंही त्यानं म्हटलं होतं.

ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट असणारा नीरज चोप्रा हा मूळचा पानिपत, हरियाणाचा आहे.



अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे.

नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते.



2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली.