अभिनेत्री श्रुती हासननं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रुतीनं तिच्या ब्लॅक आऊटफिटमधील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. श्रुतीनं Break the chains असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. ब्लॅक साडी, सिल्वर कलरचा नेकपीस आणि इअरिंग्स अशा लूकमधील फोटो श्रुतीनं शेअर केले आहेत. श्रुतीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. श्रुती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. श्रुतीनं तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लक, गब्बर इज बॅक आणि वेलकम बॅक या चित्रपटांमध्ये श्रुतीनं काम केलं. श्रुतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. श्रुती ही अनेकवेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.