लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला अनेक भाविक गर्दी करतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. अभिनेत्री पूजी हेगडेनं देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतले आहे. तसेच शिल्पा शेट्टीनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. शिल्पानं तिच्या आईसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) शुक्रवार (22 सप्टेंबर) मुंबईतील (Mumbai) 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं आहे. सनीचा पती डॅनियल वेबरनं (Daniel Weber) देखील सनीसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सनी आणि डॅनियल वेबर यांनी दोघांनी मिळून बाप्पाचं दर्शन घेतलं. रिद्धी डोगरानं देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. रिद्धी ही काही सध्या जवान या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.