बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखनं जवान या चित्रपटात डबल रोल केला आहे. जवान या चित्रपटासोबत शाहरुखनं आणखी काही चित्रपटांमध्ये देखील डबल रोल केला आहे. शाहरुखनं ओम शांती ओम या चित्रपटामध्ये डबल रोल केला होता. 2016 मध्ये शाहरुखचा फॅन हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये शाहरुखनं एक सुपरस्टार आणि त्याचा फॅन अशा दोन भूमिका साकारल्या. शाहरुखनं डॉन या चित्रपटामध्ये देखील डबल रोल केला होता. रब ने बना दी जोडी या चित्रपटामध्ये देखील शाहरुखनं डबल रोल केला होता. डुप्लीकेट, इंग्लिश बाबू देसी मेम या चित्रपटांमध्ये देखील शाहरुखनं डबल रोल केला आहे. शाहरुखच्या जवान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता प्रेक्षक शाहरुखच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.