ओटीटीवर (OTT) घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यास अनेकांना आवडते.



नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिज्नी+हॉटस्टार, झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते.



या आठवड्यात काही चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हे चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल...



अभिनेत्री करीना कपूरचा जाने जान हा चित्रपट 21 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.



जाने जान चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. या चित्रपटात विजय वर्मानं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.



दुलकर सलमानचा (Dulquer Salmaan) किंग ऑफ कोथा हा चित्रपट 24 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे.



22 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये तुम्ही किंग ऑफ कोथा हा चित्रपट पाहू शकता.



फास्ट एक्स हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.



मिशेल रॉड्रिग्ज, जेसन स्टॅथम, टायरेस गिब्सन, जेसन मोमोआ, जॉन सीना, जॉर्डाना ब्रेवस्टर, नॅथली इमॅन्युएल, सुंग कांग, ब्री लार्सन, डॅनिएला मेल्चियर, अॅलन रिचसन, स्कॉट ईस्टवुड, हेलन मिरेन, चार्लीझ थेरॉन, आणि रिच मोरेनो या प्रसिद्ध कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे.



ओटीटीवरील हे चित्रपट तुम्ही पाहू शकता.