अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांशिवाय सोशल मीडियातील पोस्टवरूनही चर्चेत असते.

अभिनेत्री श्रिया सरनने ऑफ व्हाईट कलरच्या गाऊनमधील रेड कार्पेट लूक शेअर केला आहे.

अभिनेत्री श्रिया सरनच्या या ग्लॅमरस लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

ऑफ व्हाईट डिझायनर गाऊन, बन हेअरस्टाईल आणि डायमंड ज्वेलरीमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.


श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

नुकतीच ती आरआरआर या चित्रपटात झळकली होती.

बॉलिवूड चित्रपट 'दृश्यम'मध्ये तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री श्रिया सरन ही आगामी 'गमनम', 'नरगासूरन' आणि 'तडका' आदी चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री श्रिया सरन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.