नववधू कतरिनानं लग्नाचे नवे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमधील कतरिनाचा 'महाराणी' साज चर्चेचा विषय ठरलाय. विकी कतरिनाच्या शाही विवाहसोहळ्याचे नवे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. कतरिनानं इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. कतरिनाचा शाही अंदाज पाहून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ब्रायडल एन्ट्री घेताना कतरिना एखाद्या महाराणीप्रमाणेच दिसत आहे. नववधू साजात कतरिना 'महाराणी' प्रमाणे दिसत आहे. कतरिनानं फोटो शेअर करताना बहिणींसाठी खास कॅप्शन दिलंय. माझ्या बहिणी माझा आधारस्तंभ, असं कॅप्शन कतरिनानं फोटो शेअर करताना दिलंय. सर्व फोटो : @katrinakaif/Instagram