BMW आजपासून भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये पदार्पण करत आहे. BMW ची सर्वात पहिली फुल इलेक्ट्रिक SUV BMW iX कार आज लॉन्च होणार आहे BMW iX ची स्पर्धा मर्सिडीज-बेंज ईक्युसी आणि ऑडी ई-ट्रॉन यांच्याशी होणार आहे BMW iX ग्लोबली दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. iX xDrive 40 आणि iX xDrive 50 हे दोन व्हेरियंट आहेत. iX xDrive 40 व्हेरियंट 6.1 सेकेंदांमध्ये 0-100kph च्या वेगानं धावू शकते. iX xDrive 50 4.6 सेकंदांमध्ये 0-100kph वेगानं धावू शकते. दोन्ही व्हेरियंटमध्ये एक ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेट-अप देण्यात आला आहे. BMW IX xDrive 50 मध्ये 105.2 kWh चा बॅटरी पॅक आहे. iX xDrive 50 ची बॅटरी 35 मिनिटांमध्ये 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. BMW iX xDrive 40 ची बॅटरी 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी 31 मिनिटं घेते.