पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा जन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यात होणार आहे.
गणेश जयंतीनिमित्त मंदिरासह गाभाऱ्यात फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे.
आज माघी गणेश जयंती आहे. राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे.
राज्यभरातील गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही जोरदार तयारी करण्यात आली आहे.
गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
दगडूशेठ गणपतीचा मुख्य गणेशजन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यात पार पडणार आहे.
228 तोळ्याचा हा पाळणा भाविकांनी दिलेल्या देणगीतून बनवण्यात आला आहे.
या निमित्ताने दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली आहे
त्याचबरोबर इथे केलेली सजावट देखील खास आहे