केळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण आपली भूक भागवण्यासाठी केळ खातात. हिवाळ्यात केळ खावं की नाही याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. कारण हिवाळ्यात केळं खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता असं म्हटलं जातं. त्यामुळे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. केळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशिम असतं. हिवाळ्यात केळं खाऊ शकतात. जे लोक कमी पाणी पितात त्यांनी केळं खाणं फायदेशीर ठरेल. या फळातील कॅलरीजमुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. केळ खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास देखील दूर होण्यास मदत होते.