हल्ली हृदयाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तसेच एका संशोधनानुसार, सकाळच्या वेळेत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे. सकाळी 6 वाजताच्या सुमारास आणि दुपारच्या दरम्यान येणारे हार्ट अटॅक हे जास्त धोकादायक असल्याचं म्हटलं जातं. ज्यामध्ये जवळपास 20 टक्के पेशी या डेड होतात. इतर कोणत्याही दिवशी हार्ट अटॅक आल्यास असं होतं. याला कार्डिवॅस्कुलर फिजिओलॉजिकल म्हटलं जातं. जेव्हा कोणती व्यक्ती झोपेतून उठते तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. यामध्ये कोरोनरी आर्टरी ब्लॉक होऊन जातात. अशा वेळेस ऑक्सिजनची कमतरता शरीरात निर्माण होते. बऱ्याचदा अचानक असा हार्ट अटॅक येतो.