हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

महाराजांची जयंती फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

लंडन येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लंडन येथिल संसद चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

यावेळी विद्यार्थांनी जय शिवराय अशा घोषणांनी संसदभवन परिसर दणाणून सोडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित आहे

आपल्या युद्ध कला आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्य यांमुळे शिवाजी महाराज हे आदर्श राजे ठरले

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले

शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देणारे अनेक युद्ध साहित्य लंडन येथिल म्यूजियमला आहे

शिवाजी महाराजांचे एक अस्सल पेंटिंग देखील ब्रिटिश लायब्ररीला आहे.

लंडनमध्ये घुमला 'जय शिवाजी, जय भवानी'चा जयघो