सूर्य (Sun) आपल्या सौरमालेतील मुख्य घटक आहे. आपण सूर्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत.
आपला दिनक्रम आपलं संपूर्ण आयुष्य सूर्याभोवती फिरतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सध्या संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे, ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग.
शास्त्रज्ञांकडून सूर्याची उष्णता आणि ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शास्त्रज्ञांचा एक गट ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.
काही देशांमधील शास्त्रज्ञ सूर्याची उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही शास्त्रज्ञांनी या प्रयोगाला विरोध केला आहे.
त्यांच्या मते, हा प्रयोग पृथ्वीसाठी अतिशय धोकादायक आणि विनाशकारी ठरु शकतो.
मीडिया रिपोर्टनुसार, काही शास्त्रज्ञ सूर्यप्रकाश आणि उष्णता वापरण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत.
सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळेल, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.
मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, हा प्रकल्प तातडीनं थांबवला नाही, तर येणाऱ्या काळात हे पृथ्वीसाठी घातक पाऊल ठरू शकतं.
महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञांच्या दोन गटांमध्ये हा वादा सुरू असतानाही या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या संशोधनाला शास्त्रज्ञांनी 'सोलर जिओ इंजिनीअरिंग' (Solar Geo Engineering) असं म्हटलं आहे.
या संशोधनामध्ये मोठा धोका असल्याचं सांगत काही शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
याबाबतच्या सर्व संभाव्य धोक्यांबाबत काही शास्त्रज्ञांनी इशारा दिल्यानंतरही या प्रकल्पावर काम करणारे शास्त्रज्ञ हा प्रकल्प थांबवण्याच्या विचारात नाहीत.
शास्त्रज्ञ सूर्याची पृथ्वीवर येणारी उष्णता आणि सूर्यप्रकाश कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रकल्पावर आतापर्यंत मोठी गुंतवणूक झाली आहे.