'बिग बॉस' फेम शिव ठाकरे सध्या त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापमुळे चर्चेत आहे. शिव 'बिग बॉस'च्या घरात असताना त्याची आई म्हणाली होती,आमच्यासाठी वीणा जगताप हा विषय कधीच संपला आहे. आईच्या भाष्यावर स्पष्टीकरण देत शिव ठाकरे ,वीणाने लग्नाचं नाटक केलेलं नाही. फक्त काही कारणांनी आमचं नातं पुढे जाऊ शकलं नाही. शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात प्रचंड गाजली. शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. शिव आणि वीणाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. शिव आणि वीणाचं नातं काही कारणांनी पुढे जाऊ शकलं नाही अखेर काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला. शिव ठाकरेसाठी वीणा जगतापसोबतचं नातं खूपच खास आहे. शिव आणि वीणा रिलेशनमध्ये नसले तरी आजही ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. शिव आणि वीणाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.