‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते.
ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली.
झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आहे.
सर्वात लोकप्रिय चेहरा या पुरस्काराच्या रूपाने प्रेक्षकांची पसंती कायम स्पेशल राहील असं म्हणत ऋताने हा आनंद साजरा केला आहे.
छोट्या पडद्यावर मोठी प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री ऋता दुर्गळे सरत्या वर्षात मोठ्या पडद्यावरही झळकली होती.
झी टॉकीज या वाहिनीतर्फे महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून प्रेक्षकांनी पसंती दिली हेच माझ्या अभिनयाचं सार आहे असं मला वाटतं, ऋताने म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून मिळलेली पुरस्काराची भेट आयुष्यभर एक स्पेशल पुरस्कार बनवून राहील, अशा भावना ऋताने व्यक्त केल्या आहेत.
या पुरस्कारानंतर ऋताने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हातात ट्रॉफि घेतलेल्या ऋताच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असल्याचे दिसत आहे.