अभिनेत्री हिना खानने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिनाची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये हिना खान ब्लॅक कलरच्या डीपनेक क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. हिनाने टॉपवर ब्लेझरही परिधान केला आहे. या फोटोंमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. हिना खानने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. तिने कानात काळ्या आणि लाल रंगाचे झुमके आणि गळ्यात नेकपीस घातला आहे. हिना खानने कॅमेऱ्यासमोर अनेक वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंना लाईक करून चाहते तिला गॉर्जियस म्हणत आहेत. आतापर्यंत 79 हजारांहून अधिक लोकांनी तिच्या फोटोंना लाईक केले आहे.