उत्तराखंड येथील या प्रसिद्ध मंदिराविषयी असे सांगितले जाते की, येथे शंकर-पार्वती यांचा विवाह झाला. येथे लांबून लोक आपल्या लग्नाच्या गाठी बांधण्यासाठी येतात. त्यांची अशी भावना आहे की आपले ही प्रेम भगवान शंकर आणि माता पार्वती सारखे आसवे. उत्तराखंड येथील रुद्र प्रयाग जिल्ह्यात वसलेले पवित्र त्रियुगीनारायण मंदिराविषयी असे म्हटले जाते की, ही तीच जागा आहे जिथे भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह झाला. या मंदिराच्या बाहेत असलेला होम हा सतत पेटलेला असतो. मंदिरातील पुजाऱ्यांच्या म्हणन्यानुर हा तोच होम आहे जिथे शंकर-पार्वती यांनी फेरे घेत विवाह केला. यामुळेच या जागेला अत्यंत पवित्र मानले जाते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.