बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या स्टाईलची नेहमीच चर्चा पाहायला मिळतेय नुकताच तिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो इस्टाग्रामवर शेअर केले आहेत या लूकमध्ये शिल्पाचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं दिसून येतंय शिल्पा बॉलिवूडच्या फॅशन आयकॉनपैकी एक आहे शिल्पा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं शिल्पा आपल्या वेगवेगळ्या लूकच्या पोस्ट शेअर करत असते, जे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात शिल्पा शेट्टी पुन्हा एकद्या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये झळकणार आहे शिल्पा 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तिच्यासोबत या कार्यक्रमात अभिनेत्री किरण खेर, आणि रॅपर बादशाहही असणार आहेत शिल्पा शूटींगदरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते