प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मोशन पोस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्र हा पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे, असं म्हटलं जात आहे.