होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीतील गुरुद्वारला भेट दिली. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीने आलिया भट्टविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आलिया भट्ट काल रात्री चार्टड विमानाने मुंबईत दाखल झाली आहे.