महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध होते.



त्यांच्या हजरजबाबीपणा देखील अनेकवेळा अनुभवायला मिळायचा.



त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं देखील त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची काही उदाहरणं सांगितली आहेत.



रितेशनं माझा कट्ट्यावर बोलताना सांगितलं होतं की, ज्यावेळी मला चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यावेळी मी बाबांना (विलासराव देशमुख) ही गोष्ट सांगण्यासाठी आलो.



ते मला म्हणाले की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल


त्यांचं हे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं.



तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी



मला जाणीव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत.



आपल्याला सिनेमा करण्याआधी घरी सांगावं लागणार



मग मी बाबांना भेटायला गेलो. वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो आणि चित्रपट करणार असल्याचं सांगितलं.