आयपीएल 2023 आधी पंजाब किंग्स संघानं मोठा फेरबदल केला. मयांक अग्रवाल याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. सलामी फलंदाज शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. पंजाब किंग्सनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे मयांक अग्रवालच्या तुलनेत शिखर धवनकडे कर्णधारपदाचा अनुभव जास्त बीसीसीआयनं शिखर धवनकडे भारतीय संघाची धुरा सोपवली होती. आयपीएलच्या मागील हंगामात शिखरची दमदार फलंदाजी धवनने 14 सामन्यात 38 च्या सरासरीनं 460 धावा केल्या होत्या. पंजाबकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये शिखर पहिल्या क्रमांकावर होता. या हंगामात धवनने तीन अर्धशतकं झळकावली होती.