यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक नजरा या रोनाल्डोवर असतील, त्याची निवृत्ती जवळ आल्याने त्याचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. जगातील बेस्ट डिफेन्डर्सपैकी एक असणाऱ्या नेदरलँडच्या Virgil van Dijk याच्याकडेही फुटबॉलप्रेमींचं लक्ष असेल. युनायटेड स्टेट्सचा Christian Mate Pulisic हा देखील यंदा चमकू शकतो. स्पेनचा पेद्री याचा खेळ स्पेनला वर्ल्डकपमध्ये पुन्हा अच्छे दिन आणून देऊ शकतो अशी आशा आहे. ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार यंदा चॅम्पियन ब्राझीलला विश्वचषक जिंकवून देईल का?हे पाहावे लागेल. रोनाल्डोप्रमाणेच मेस्सीचाही हा निवृत्ती घेण्याच्या शक्यतेमुळे शेवटचा विश्वचषक असू शकतो, त्यामुळे त्याच्यावरही सर्व जगाच्या नजरा असतील. युवा स्टार खेळाडू एमबापे यंदाही फ्रान्सला विश्वचषक जिंकवून देईल का? हे पाहण्याजोगे असेल. इंग्लंड कर्णधार हॅऱी केन संघासाठी कशी कामगिरी करेल याकडे इंग्लंडवासियांचे लक्ष असेल. बेल्जियमचा स्टार मिडफिल्डर Kevin De Bruyne यंदाही चमकणार का? हे पाहण्याजोगे असेल. सध्या फुटबॉल जगतातील स्टार बेन्झिमा फ्रान्ससाठी कसा खेळ करेल, याकडे फुटबॉल जगताचे लक्ष असणार आहे.