कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या शहजादा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. शहजादा चित्रपटानं ओपनिंग-डेला 6 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 6.65 कोटी कमावले. तर तिसऱ्या दिवशी कार्तिकच्या ‘शहजादा’नं 7.55 कोटींची कमाई केली. शहजादा या चित्रपटानं चौथ्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली तसेच पाचव्या दिवशी या चित्रपटानं 2.06 कमावले. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या दिवशी या चित्रपटानं 1.80 कोटींची कमाई केलेली आहे. आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 26.31 एवढे झाली आहे. ‘शहजादा’हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार की नाही? असा प्रश्न आता कार्तिकच्या चाहत्यांना पडला आहे. शहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. शहजादा हा जरी रोमॅंटिक चित्रपट असला तरी या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. कार्तिकचा शहजादा हा चित्रपट अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे.